यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांची जबाबदारी असते. मात्र साकळी येथील केंद्रप्रमुख पद हे प्रभारी असल्यामुळे परिसरातील शाळांवरील शिक्षकांवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थितीत होत आहे.
यावल तालुक्यातीत साकळी केद्र अंतर्गत परिसरातील आठ-दहा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. मागील चार वर्षापासून या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केद्र प्रमुखांची नेमणूक होत नसल्यामुळे शाळांचे कारभार हे वाऱ्यावर आहेत. शिक्षकांवर कुणाचेही अंकुश नसल्याने ती मंडळी आपली मनमानी करीत असुन मर्जीनुसार व सोयीनुसार ये- जा करीत आहे. तर काही शिक्षक आपल्या खाजगी कामाकरीता पंचायत समिती यावल व तहसील कार्यलयात फिरत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाकडुन ग्रामीण भागातील शाळा नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी युद्धपातळीवर डिजीटल करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असतांना मात्र साकळी गावाजवळील मनवेल येथील परिसरात एकही शाळा डिजीटल होत नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्यात वाढ होण्याऐवजी घटत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील ठरावीक शिक्षक वेळापत्रकाला तिंलाजली देत आहे. शिक्षकच प्रभारी केंद्र प्रमुख असल्यामुळे फक्त सह्याजीराव असल्यामुळे फावल्या वेळेत शाळांमध्ये व्हिजीट देत असल्यामुळे शांळावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पालकवर्गात उपस्थित करण्यात येत असून शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुपारी 3 वाजेपासुन शिक्षक मर्जीनुसार ये-जा करतात, शाळा व्यवस्थापन समीतीचा पदाधिकारी यांना हाताशी धरुन शाळामध्ये ये-जा करीत असल्यामुळे विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे साकळी येथील राहणारे नवनियुक्त शिक्षण समीतीचे सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांचाकडे परिसरातील अनेक पालकवर्ग या संदर्भात लिखित तक्रार करणार असल्याचे पालकांनी सांगितले आहे.