शेतकर्‍यांना जुन्या पद्धतीने वीज जोडणी मिळावी-मनसेची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकर्‍यांना जुन्या पध्दतीनेच वीज जोडणी करून मिळावी अशी मागणी मनसेतर्फे आ. शिरीषदादा चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

तालुक्यात पारंपारीक पद्धतीने नविन वीज कनेशक्शन देण्याचे महावितरण व्दारे बंद केले असुन व स्वतः शेतकर्‍यांने पैसे खर्च करून आपल्या शेतात डीपी बसविण्याचा निर्णय हा शेतकरी बांधवांना पटलेला नाही. परिणामी, शासनाने घेतलेले निर्णय तात्काळ बदल करून पुर्वी प्रमाणेच शेतकर्‍यांना विजजोडणी करून मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढुन आपल्या शेतात विहीरी खोदल्या आहेत , तर एवढेच नाही तर पाईपलाईन देखील टाकलेली आहे. दरम्यान शेतातीत आपली पिके वाचविण्या करिता ही सर्व प्रक्रीया पुर्ण केली असतांना आता शेतकरी बांधवांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत.

वीज कनेक्शन आवश्यक असलेल्या शेतकर्‍यांना विज कनेक्शन देणे बंद करण्यात येवुन उच्च दाब वितरण प्रणाली एच .व्ही .डी .एस अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफार्मरचा पर्याय दिला आहे. या सर्व गोंधळलेल्या विषयामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात विज पोहचविणे बंद झाल्याने विजे अभावी शेतातील शेतमाल प्रक्रीया यंत्र, अवजारे , मळणी यंत्र तसेच रात्रीच्या वेळी वन प्राण्यापासुन पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र विजअभावी बंद पडल्याने कष्टकरी शेतकरी बांधव हे चांगलेच संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने पुर्वीच्याच पारंपारीक विजजोडणी आणि डी .पी. वीज असे दोन्ही गरजेचे असुन शेतकर्‍यांच्या मागणी अनुसार सेवा करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे मनसेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, मनसेचे यावल तालुका संजय नन्नवरे, विरेन्द्र राजपुत , आबीद कच्छी , साहिल बडगुजर, अजय तायडे यांनी केली. दरम्यान, आपण या प्रश्‍नाबाबत राज्याचे उर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्या बोलणी करून कसा यातुन मार्ग काढता येईल असा सकारात्मक दृष्टिकोण समोर ठेवुन चर्चा केली. याशिवाय यावल ते भुसावल मार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत आणी डोंगर कठोरा ते सातोद वड्री दरम्यान पठानकोट जंगली रस्त्यावर सुरू असलेल्या निर्माणधिन पुलाच्या कामाचे छत कोसळण्याच्या विषयास आमदार शिरीषदादा चौधरी यांनी चांगलेच गांभीर्याने घेतले असल्याचे दिसुन आले आहे.

Protected Content