मराठमोळे मनोज नरवणे होणारे नवे लष्करप्रमुख

manoj narvane

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज नरवणे हे देशाचे नवे लष्करप्रमुख होणार असून ते बिपीन रावत यांची जागा घेणार आहेत.

विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आता ते प्रमुख बनणार आहेत.

मनोज नरवणे यांनी १९८० मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधिशपदी शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून यानंतर आता लष्कर प्रमुखपद सुध्दा मराठी मान्यवराकडे आल्याची बाब ही आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशीच आहे.

Protected Content