मनोज लोहार यांना न्याय मिळण्यासाठी भुसावळात एक दिवसीय धरणे आंदोलन (व्हीडीओ)

भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात पूर्वी नियुक्तीस असलेल्या आय.पी.एस. अधिकारी मनोज लोहार यांच्यावर आकसाने कारवाई करण्यात आली असून त्यांना अन्यायकारक शिक्षा झाली असल्याचा आरोप करीत, त्यांना न्याय मिळावा यासाठी ‘जनता की अदालत’ या संघटनेतर्फे आज (दि.१४) येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

एका चांगल्या व स्वाभिमानी आयपीएस पोलीस अधिकाऱ्यावर खंडणी व अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा करून कारागृहात बंदिस्त केल्याने त्याचेवर अन्याय झाला आहे. वरील प्रकरणाकडे महाराष्ट्र व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. लोहार यांची जन्मठेपेची शिक्षा त्वरित रद्द करून आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस सेवेत त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा समाविष्ट करून घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी ‘जनता की आदालत’ संघटनेने केली आहे.

Add Comment

Protected Content