खामगावात ‘डिजिटल टेक्नॉलॉजी मुक्त तास’चा संकल्प (व्हिडीओ)

khamgaon news 1

खामगाव, अमोल सराफ | येथील सेवाभावी ‘मिशन ०२’ या ग्रुपच्या सदस्यांनी एकत्रित येऊन शहराला ग्रीन सिटी करण्याचा विडा उचलला आहे. त्यानिमित्त २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सामूहिक ध्वजारोहण करण्यात येवून परिसरातील विद्यार्थी व नागरिक यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार डिजिटल टेक्नॉलॉजी मुक्त तास व्यतीत केला.

 

पंतप्रधानांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात नुकतेच हे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मिशन ०२ ग्रुप’ ने सकाळी सामूहिक ध्वजारोहण झाल्यानंतर जवळपास एक तास डिजिटल टेकक्नॉलॉजीला एक तास निवृत्त केले. या दरम्यान कोणत्याही सदस्याने टेक्नॉलॉजी चा वापर केला नाही. तसेच दररोज किमान एक तास टेक्नॉलॉजीपासून दूर राहण्याचा संकल्प केला.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता ‘मिशन ०२ ग्रुप’ चे डॉ. कालिदास थानवी, डॉ. गायत्री थानवी, अमोल सराफ, जेष्ठ नागरिक बाबूजी थानवी, रमेश दिवाणे, राजू भटकर, आनंद थानवी, डॉ. कृष्णा वयास, डॉ. खुशबू छांगाणी, डॉ. राठी, जोशी, रवी कुस्तुरे, डॉ. प्रियांका चौधरी, शिव खंडोबा महिला मंडळ यांच्यासह मोठया संख्येने परिसरातील नागिरक उपस्थित होते.

मोबाईलचे सार्वत्रिक दुष्पपरिणाम
मोबाइलच्या गरजेचे रुपांतर व्यसनात कधी झाले हे आपल्याला कळलेच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. त्यातूनच सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय.आपल्या आसपास मोबाइलच्या अतिवापराची अशीच उदाहरण आपण बघत असतो. मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. तरुण अशा रीतीने मोबाइलच्या आहारी जाण्यामागे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्या आणि मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या या दोघांचाही मोठा हातभार आहे. ‘मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरात तंत्राला बळी पडणारा तरुण वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या संख्येबद्दल सांगितले जाते की, जास्त मोबाइल वापरामुळे नेटवर्कचे टॉवरसुद्धा जास्त फ्रीक्वेन्सी प्रसारित करतात. पण यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित होत आहे. या टॉवरमधून प्रसारित होणाऱ्या या फ्रीक्वेन्सीचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. परिणामी त्यांना काही ना काही शारीरिक त्रास आहे.

‘मोबाइलचे अनेक फायदे आहेत म्हणूनच जगभरात मोबाइल इतक्या मोठय़ा संख्येने वापरला जातोय. नेट बँकिंग, कॅब बुकिंग, सिलेंडर बुकिंग, संबंधित व्यक्तींशी संपर्कात राहणे अशी अनेक महत्त्वाची कामे मोबाइलमार्फत होतात. ‘जेव्हा एखाद्या गोष्टीशिवाय एखादी व्यक्ती राहूच शकत नाही किंवा त्या गोष्टीचा वियोग त्या व्यक्तीला सहन होत नाही तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीच्या व्यसनाधीन झाली आहे, असे म्हटले जाते. तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास मोबाइलवर असतो. पण खरं तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण २० मिनिटं इतकंच असायला हवं. म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा.. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढतच चालली आहे. मोबाइलच्या अधीन होणाऱ्या लहान मुलांमध्येही त्यांच्यातला हट्टीपणा वाढतो, त्यांना झोपेचे आजार होतात, याचा परिणाम शिक्षणावर आणि संवादावर जाणवतो.

 

Protected Content