मंगळग्रह मंदिरात होणार गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह २५ रोजी मंदिरात गणेश जयंतीला श्री गणेशाच्या चार अभिषेक मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

गणेश जयंतीच्या निमित्त्ताने मंगळग्रह मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेकासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने पंचधातूच्या चार गणेश मूर्ती उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून आणल्या आहेत. या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल .जिल्हाधिकारी अमन मित्तल, बेटी बचाव बेटी पढाव चे प्रमुख डॉ. राजेंद्र फडके, दाल परिवार ग्रुपचे प्रमुख प्रेम कोगटा, आणि माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील हे या पूजेचे मानकरी आहेत.

दरम्यान, गणेश पुराणातील कथेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने गणेशाला निर्माण केला तो दिवस म्हणजेच श्री गणेश जयंती…! भगवान महादेवाने गणेशाला अग्रपूजेचा मान दिला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत श्री गणेश जयंतीला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी भक्तांनी गणेशाची मनोभावे पूजा – अर्चा , अभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात. अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मंगळग्रह मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

Protected Content

%d bloggers like this: