यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शिवारातील स्वामी जनार्दन मंदीराची दानपेटी फोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल शिवारात श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ध्यान मंदीर आहे. या ठिकाणी अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात. चेतन देवीदास निगडे (वय-३७) हा तरूण रोजी सकाळी आणि संध्याकाळी मंदीरातील साफसफाई करून पुजापाठ करतो. सोमवार १८ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदीराची दानपेटीचे कुलूप तोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चेतन निगडे याने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.