जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणणाऱ्या संशयित आरोपीला सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पिडीत मुलीसह संशयिताला राळेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील एका गावात राहणारी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अकरावीचा पेपर देण्यासाठी घरून निघाली होती. दरम्यान तिला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी राहत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील यांनी गुरूवार ९ जून रोजी सकाळी सुप्रीम कॉलनीत जाऊन संशयित आरोपी योगेश राठोड यासह पीडित मुलीला ताब्यात घेतले. दोघांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे यावतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलीस ठाण्याकडे रवाना झाले आहे.