भुसावळात मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्याला अटक

crime busaval

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जाम मोहल्ला परिसरात मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख सद्दाम शेख तस्लिम (वय-26) रा. नसरवंजी फाईल भुसावळ असे आरोपीचे नाव असून तो स्वता:च्या फायदासाठी शहरात जाम मोहल्ला भागात गोल्डन लॉजचा बाजूला कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवत असल्याची माहिती पो.नि.दिलीप सो यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचत आज दि.25 सप्टेंबर रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास त्याच्यावर मुंबई जुगार ऍक्ट कलम-12 (अ)प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. त्यावेळी शेखजवळील 810 रुपये रोख आणि सट्टा साधनासह अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पो.अधिकारी गजानन राठोड, व पो.नि.दिलीप भागवत सो यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शंकर पाटील, संजय भदाणे, पो.नि.रमण सुरळकर, पो.का.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आणि प्रशांत परदेशी यांनी कार्यवाही केली आहे.

 

Protected Content