अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; भडगाव पोलीसात गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. दरम्यान गावातील प्रभाकर कौतीक माळी या तरूणाने १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ८ वाजेच्या त्यांच्या घरात कुणीही नसतांना पिडीत मुलीला बोलावून घेतले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीने कुटुंबियाला सांगितला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी प्रभाकर कौतीक माळी याला भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलवाडे करीत आहे.

Protected Content