घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यास अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरगुती गॅस अवैधरित्या चारचाकी वाहनात भरून गैरवापर करणाऱ्या एकाला सुप्रिम कॉलनीतून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यात १९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या शिवशाही हॉटेलच्या शेजारी एका भिंतीच्या आडोशाला तात्पुरते शेड बनवून घरगुती गॅस सिलेंडरच्या वापर अवैधपणे वाहनात भरून त्यांचा गैरवापर होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून संशयित आरोपी विजय शंकर जाधव वय 52 रा. सुप्रीम कॉलनी खूबचंद नगर जळगाव, याला अटक केली. त्याच्याकडून घरगुती गॅसने भरलेले दोन सिलेंडर तसेच वाहनांमध्ये भरण्यासाठी उपयोगात येणारे मशीन, नळी, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Protected Content