मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा| एनसीबीचे कार्डीलिया प्रकरण खोटे असल्याचे मंत्री मलिक यांनी म्हटले होते. ते खरे झाले असून आर्यनखानला निर्दोष मुक्त केले, त्याच प्रमाणे मंत्री मलिक हे लवकरच आमच्यासोबत असतील, असे मलिक यांची कन्या सना मलिक शेख यांनी म्हटले आहे.
कार्डीलिया क्रुज प्रकरणी कारवाई हि बनावट असून त्यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एनसीबीने आर्यन खान तसेच अन्य पाच जणांला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यासह त्याच्या पथकावर कारवाई करणार कि गुन्हेगारांवर कारवाई करणार असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मलिक यांची कन्या सना मलिक शेख यांनी उपस्थित केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, आणि लवकरच मंत्री मलिक हे आमच्यासोबत असतील असेही शेख यांनी म्हटले आहे..