सोनिया, राहुल गांधी यांचे कर्नाटक पेच विरोधात आंदोलन

70170177

नवी दिल्ली (वृत्तसेवा) : आज काँग्रेसने भारतीय जनता पक्ष हा कर्नाटकातील आमदारांना खरेदी करून तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजपवर केला आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या या स्थितीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले आहेत.

कर्नाटकपाठोपाठ गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने कर्नाटक आणि गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला विरोध करण्याची रणनीती आखली आहे. संसद परिसरात धरणं देतं राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच गोवा आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही निदर्शने करत असल्याचं राहुल यांनी सांगितलं. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात ‘लोकशाही वाचावा ‘ असे लिहिले फलक होते.

Protected Content