राज्य माळी समाज महासंघाची बैठक उत्साहात

mali samaj mahasangh

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणीची महाबैठक येथील राजीव गांधी टाऊनमध्ये मोठया उत्साहात पार पडली.

याप्रसंगी माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी यांच्या भाषणात बोलतांना सांगतिले कि, समाज संघटन हाच विकासाचा पाया आहे. अगोदर आपले योग्य पद्धतीने समाज संघटन करा एकत्रित या तळागाळातील समाज बांधवाच्या संकटकाळी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी धावून जा समाजातल्या प्रत्येक माणसा सोबत आपुलकीचा जिव्हाळा निर्माण करा. त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा. जिह्ल्यात विखुरलेल्या माळी समाजाला एकत्र करा. महात्मा जोतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजवा. फुलेंच्या विचारांचा समाज घडवा असे आवाहन त्यांनी केले. तर जिल्ह्यातील राजकीय पुढार्‍यांनी माळी समाजाला कमी लेखू नये असा इशारादेखील त्यांनी दिली. भाजपा सरकारने माळी समाजाला अतुल सावे यांच्या रूपाने प्रतिनिधित्व दिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे त्यांनी अभिनंदन केले. पाचोरा येथे महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो स्थानिक प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावा. तसेच समाज हिताचे ठराव एकमताने पास करण्यात आले. सूत्रसंचालन रमेश सोनावणे यांनी केले.

या मेळाव्याला अनिल महाजन (प्रदेश अध्यक्ष)डी पी माळी (प्रदेश कार्याध्यक्ष), प्रवीण महाजन (प्रदेश संघटक), डी बी महाजन (विभागीय अध्यक्ष), काशिनाथ जाधव (विश्‍वस्त) रमेश सोनवणे (जिल्हाध्यक्ष,जळगाव),विठ्ठल महाजन,उध्दव महाजन,अशोक खलाने, सागर महाजन,आप्पा महाजन,भीमराव खलाने,अरुण माळी,गोरख महाजन, संतोष महाजन, कैलाश महाजन,शिवाजी महाजन,भूषण महाजन डॉ.रवींद्र महाजन, प्रभाकर महाजन,योगेश सपकाळ,गोरख महाजन,आप्पा महाजन,जगदीश महाजन,भास्कर महाले,के एस महाजन, अमृत बनकर,खुशाल अहिरे,मुकुंदा महाजन,अरुण माळी,भिमराव खलाने, विकास महाजन,कैलास माळी,अमोल महाजन, भूषण महाजन,रोहित महाजन , नाना पंढरीनाथ महाजन ,समाधान महाजन,राकेश महाजन व इतर समाज बांधव उपस्थित होते.

या मेळाव्यात नवीन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. यात डॉ.रवींद्र महाजन(वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष जळगाव), प्रभाकर महाजन(जळगाव महानगर ,जिल्हा अध्यक्ष), योगेश सपकाळ (औरंगाबाद,जिल्हा अध्यक्ष),गोरख महाजन (जिल्हा उपाध्यक्ष),आप्पा महाजन (जिल्हा कार्याध्यक्ष),जगदीश महाजन(शहर अध्यक्ष,चाळीसगाव) भास्कर महाले (जिल्हा सचिव,जळगाव), के. एस. महाजन (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), अमृत बनकर (जिल्हा सहसंघटक),खुशाल अहिरे(जळगाव जिल्हा,प्रसिद्धी),मुकुंदा महाजन (जिल्हा सचिव), अरुण माळी (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष), भिमराव खलाने (उपाध्यक्ष,चाळीसगाव), विकास महाजन( उपाध्यक्ष भडगाव), कैलास माळी ( उपाध्यक्ष,बोधवड), अमोल महाजन (पाचोरा युवक आघाडी शहर संघटक) , भूषण महाजन ( जिल्हा युवक कार्याध्यक्ष),रोहित महाजन (पाचोरा युवक अध्यक्ष),नाना पंढरीनाथ महाजन (पाचोरा तालुका अध्यक्ष), समाधान महाजन ( जिल्हा उपाध्यक्ष युवक) राकेश महाजन (प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया पाचोरा) आदींचा समावेश आहे.

Protected Content