यावल तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सुचना फलक लावणे अनिवार्य करा : भाजपाची मागणी

यावल,  प्रतिनिधी  । तालुक्यात व शहरातील स्वस्त धान्य दुकानातुन सर्वसामान्य नागरीकांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य वितरणात अनियमितेचा मोठा सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे लिखित तक्रारी व्दारे केली आहे.

 

या संदर्भात दिलेल्या निवेदनात उमेश फेगडे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरणात अनियमितता दिसुन येत आहे.  सदर स्वस्त धान्य दुकानदार कोणते धान्य उपल्बध आहे व कोणत्या योजनेमधला व किती आहे याची सविस्तर माहीती दुकानावरील फलकावर लिखाण करीत नाही. यामुळे आशिक्षीत व सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक होत असते.  नागरीकांना शासनाच्या नियमानुसार प्रतिमाह वितरण होणारे धान्य मिळत नसल्याने नागरीकांना पुर्ण लाभ मिळतांना दिसत नाही. या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना गैरकारभार करण्यास वाव मिळतो. याकरिता महसुल प्रशासनाने यावल शहर व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवरील धान्याचा गैरकारभार थांबण्याचे असेल तर दुकानदाराने वितरणासाठी घेतलेल्या धान्यांचा सविस्तर माहीतीचे सुचना फलक हे अनिवार्य करावे. अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , शहराध्यक्ष निलेश गडे , परेश दिलीप नाईक, योगेश विजय चौधरी , राहुल पंढरीनाथ बारी यांच्या स्वाक्षरी आहे.

 

Protected Content