चाळीसगाव नगरपालिकेला वाढदिवसानिमित्त चक्क जेसीबी भेट!

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील इस्लामपुरात नाला स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या मात्र जे.सी.बी. नसल्याचे कारण सांगण्यात येत असल्याने एकाने चक्क नगरपालिकेला खेळण्यातील जे.सी.बी.च भेट देवून आपला वाढदिवस साजरा केला. 

चाळीसगाव शहरातील इस्लामपुरा नवागाव शनि मंदिरासमोरील नाल्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळवूनही कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी केली जात नसल्याने ‘मेरा गाव मेरा तीर्थ’ या अभियानाचे मुख्य प्रवर्तक विजय शर्मा यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपालिकेला चक्क खेळण्यातील जे.सी.बी. भेट दिल्याने त्यांच्या गांधिगीरी चर्चा सध्या सुरू आहे. सदर नाला हा स्वच्छ करण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदन व तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र दरवेळी जे.सी.बी नसल्याचे कारण सांगून नगरपालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे विजय शर्मा यांनी वाढदिवसानिमित्त नगरपालिकेत जाऊन खिलोनाचा जे.सी.बी च भेट दिला. याप्रसंगी विजय शर्मा, खुशाल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.