धरणगावातील महेश वाघ यांची कुस्ती स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

धरणगाव प्रतिनिधी । येथील मल्ल रमेश वाघ यांचे सुपुत्र पै.महेश वाघ याने राष्ट्रीय स्तरावर स्टुडंट ऑलम्पिक नॅशनल कुस्तीच्या ५५ किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करत सुवर्ण पदक मिळविले आहे. आता महेश हा अंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीस्पर्धेसाठी जाणार आहे.

धरणगावातील प्रसिध्द मल्ल रमेश पहेलवान वाघ यांचे सुपुत्र व कैलास माळी सर यांचे पुतणे पै.महेश वाघ याने नुकतेच महाराष्ट्राचे नेतृत्व करतर हरीयाणा येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या स्पर्धेसाठी जाणार आहे. धरणगाव येथील प्रसिद्ध मल्ल पै.संदीप कंखरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची भगिनी रुपाली वाघ ही सुद्धा राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू आहे. ती आता एनआयएस कोचचे प्रशिक्षण घेण्यासाठी पतियाळा येथे गेलेली आहे. पै. महेशच्या यशा बद्दल परीसरातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील त्याचा सत्कार केला. त्याप्रसंगी जि.प.सदस्य माधुरीताई अत्तरदे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, शहर उपाध्यक्ष सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, मिडिया प्रमुख टोनी महाजन, राजू महाजन, जुलाल भोई, रवी पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content