
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील वाणी गल्ली येथील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाची नुकतीच बैठक उत्साहात पार पडली. यावेळी मंडळाचा यंदाचा ५२ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मंडळाच्या अध्यक्षपदी महेश वाणी तर उपाध्यक्षपदी जगदीश कवडीवाले यांची निवड करण्यात आली.

बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मंडळाच्या कार्यकारिणीबाबत चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे पाचही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, भाविक आणि नागरिकांसाठी आकर्षक आरास व सजावट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश वाणी, उपाध्यक्षपदी जगदीश कवडीवाले, सचिवपदी प्रशांत श्रावगी आणि खजिनदारपदी अजय गडे यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यकारिणी सदस्य म्हणून धनंजय सराफ, संतोष कवडीवाले, प्रा. पंकज गडे, आनंद कवडीवाले, सचिन बुरुजवाले, सागर वाणी, वैभव यावलकर, हर्षल गजऋषी, शुभम वाणी, वैभव गजऋषी, गणेश गजऋषी, गिरीश भार्गव, वासुदेव कवडीवाले, दिपेश गजऋषी, सिद्धेश श्रावगी, श्रीहरी वाणी, देवेश बुरुजवाले, सुरज श्रावगी, दिपक वाणी, सिद्धेश वाणी, प्रतीक श्रावगी, जयेश गजऋषी, रामचंद्र कवडीवाले, अक्षय वाणी, यज्ञेश बुरुजवाले, अंगद यावलकर, रुपेश श्रावगी, हर्षल माळी, निषाद सराफ आणि सिद्धेश कवडीवाले यांची निवड करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेचे ५२ वे वर्ष असल्याने हा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कार्यकारिणीने केला आहे. पाच दिवस विविध कार्यक्रमांसह आकर्षक आरास सजावट करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवात धार्मिक वातावरणासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. यंदाही उत्सव शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नवनियुक्त कार्यकारिणीने नियोजन सुरू केले आहे.



