मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत नड्डा यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकही घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या बड्या नेत्यांची ही बैठक पार पडली. या बैठकीत नड्डा यांनी पक्षातील नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला.
नड्डा म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. त्यासोबतच बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेण्याच्या सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठीची कानमंत्रदेखील दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका घेण्यास सांगितले असून बंडखोरी टाळण्यावर लक्ष देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.