अडावदमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक न्यायाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अडावद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ११ एप्रिल रोजी दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध संस्था, शाळा व ग्रामपंचायतींनी एकत्र येत एकात्मतेचे दर्शन घडवले.

सकाळी वरचा माळी वाड्यात विशेष शामियाना उभारण्यात आला होता. येथे महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता माळी यांच्या भव्य प्रतिमांचे पूजन लहानथोरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर शामराव येसो महाजन विद्यालयात संस्थेचे सचिव रमेश आनंदा पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, तसेच विविध शिक्षक आणि शाळेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बुऱ्हाणखा तडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाने, उपसरपंच विजिता पाटील, व इतर पदाधिकारी, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. विविध कार्यकारी सोसायटीतही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. चेअरमन भूषण देशमुख, संचालक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा पूजनात सहभाग घेतला. संध्याकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीस अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रतिमा पूजनाने प्रारंभ केला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच बाबनखान तडवी यांनी केले, तर संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महिला मंडळ अध्यक्षा आशाताई सजन महाजन यांच्या हस्ते झाले.

मिरवणूक ग्रामपंचायत गल्ली, पंचवृक्ष चौक, नेहरू चौक, दुर्गादेवी चौक, सुभाष चौक मार्गे महात्मा फुले रोडवर संपन्न झाली. माजी सरपंच, सदस्य, शिक्षक, महिला मंडळ, तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी अडावद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Protected Content