जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजविणारे, बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, ११ एप्रिल रोजी गोदावरी फाऊंडेशनतर्फे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी म.ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण केले. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कान-नाक-घसा तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले, याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, नर्सिंगचे डायरेक्टर शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील, कान-नाक-घसा विभागाच्या रेसिडेंट डॉ.श्रृती खंडागळे, योगेश बल्लाळ, किर्ती पाटील, गौरी जोशी, दिक्षा सुरे, आशा समन्वयिका कल्याणी कुळकर्णी, मोनाली पाटील, निलीमा महाजन, सागर पाटील आदिंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.