यावल पटेल शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील पटेल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन व संचालक शशीकांत फेगडे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीणा पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमास प्रशांत फेगडे, तृप्ती पवार, सविता बारी , जयश्री चौधरी, प्रविणा पाचपंदे, रूपाली चौधरी , मिनाक्षी वारके, मंजुषा साळुंके, गुलनाझ शेख , कुंदा नारखेडे,झीनत शेख,शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content