महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे.

9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला. रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Protected Content