शफाली वर्माची भारतीय संघासाठी निवड

shaphali

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी आज भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली असून संघाचे नेतृत्व हरमनप्रीतकडे देण्यात आले. त्याचबरोबर तीन सामन्यांसाठीचा वन-डे संघही जाहीर करण्यात आला. पंधरा वर्षीय आक्रमक फलंदाज शफाली वर्मा हिचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.

मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केल्याने तिच्या भारतीय संघातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला असून या वन-डे संघाचे नेतृत्व मितालीकडे कायम आहे. शफालीने विमेन्स टी-२० चॅलेंज लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तिच्या कामगिरीने मिताली राजही प्रभावित झाली होती. हरियाणाची शफाल मितालीच्या टीम व्हेलॉसिटी संघाकडूनच खेळली होती. देशांतर्गत १९ आणि २३ वर्षांखालील स्पर्धांमध्ये तिचा स्ट्राइक रेट १५०हून अधिक आहे. त्याचबरोबर ती फिरकीपटूही आहे. गार्गी बॅनर्जीने वयाच्या १४ वर्षी (आणि १६५ दिवस) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ती भारतीय महिला संघात स्थान मिळवणारी सर्वांत युवा क्रिकेटपटू आहे. या मालिकेआधी भारतीय महिला संघाचे १२ सप्टेंबरपासून बेंगळुरू येथे सराव शिबिर होणार आहे.

Protected Content