धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने पुरस्काराकरिता त्यांच्या नावाची निवड केलेली आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार येत्या १२ मार्च रोजी मुंबई येथे देण्यात येणार आहे.
भानुदास विसावे यांना मिळालेल्या समाजभूषण पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच धरणगाव शिवसेना शाखा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून भानुदास विसावे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.