Home क्राईम धरणगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल !

धरणगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल !

0
349

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल लोहार हे करीत आहे.


Protected Content

Play sound