मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यांपासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही, असे सिध्द होते.’ अशी खदखद व्यक्त करत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील महाराज यांनी राजीनामा देणे हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटुंब प्रमुखाची उपमा दिली. शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणून मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणून माझी प्रामाणिक जबाबदारी जाणून मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.