जळगाव प्रतिनिधी । नवी पेठेतील काँग्रेस भवन येथे महानगर सेवादलाचे कार्यालयाचा महानगर प्रमुख कैलास महाजन यांच्या नेतृत्वात आज दुपारी कुलूप तोडून ताबा घेतला आहे. अशी माहिती महानगर प्रमुख कैलास महाजन यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलतांना दिली.
कैलास महाजन यांनी बोलतांना सांगितले की, जळगाव जिल्हा काँग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांना तोंडी व लेखी निवेदन देवून कार्यालयाची मागणी करून सुध्दा केवळ गटा तटाचे राजकारणामुळे धुळखात पडून असलेली हक्काची कार्यालयीन जागा दिले नाही. यासंदर्भात महानगर काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे यांच्याशी जळगाव महानगर प्रमुख कैलास महाजन यांनी चर्चा करून ताबा घेण्याच्या सुचना दिल्या. काँग्रेसच जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांनी गटातटाचे राजकारण सोडून सर्व पदाधिकारी यांना समान वागणूक घ्यायला हवी तसेच पक्षाचे काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना सावत्र वागणूक देणे बंद करावी अशी भावना महानगर प्रमुख महाजन यांनी मांडली. याच अनुषंगाने आज मंगळवार ११ मे रोजी सकाळी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्या जांचाला कंटाळून सेवादल कार्यालयाचा ताबा घेतला आहे अशी माहिती कैलास महाजन यांनी दिली.