मामाभाच्यावर जीवघेणा हल्ला; फायटर व लोखंडी सळईने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा गावातील छत्रपती शिवाजी चौक येथे जुन्या भांडणाचा जाब विचारल्याच्या कारणावरून मामाला फायटरने ते भाच्याला लोखंडी सळईने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार ६ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. या घटनेप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवारी ९ मे रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, रविंद्र भिकन सोनवणे वय-४३ रा. छत्रपती शिवाजी चौक, नांद्रा ता.जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांच्या गावातील काही तरूणांसोबत भांडण झाले होते. सोमवार ६ मे रोजी सकाळी ११ वाजता मागील भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले. या राग आल्याने भूषण रविंद्र कोळी, आश्विन जगन सोनवणे, शिवाजी रामचंद्र सोनवणे आणि जगन रामचंद्र सोनवणे सर्व रा. नांद्रा ता.जळगाव यांनी रविंद्र सोनवणे आणि त्यांचा भाचा निरंजन यांना शिवीगाळ केली. यात रविंद्र सोनवणे यांना फायटरने तर त्यांचा भाचा निरंजन याला लोखंडी सळईने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौकशी अंत अखेर गुरूवार ९ मे रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीसात भूषण रविंद्र कोळी, आश्विन जगन सोनवणे, शिवाजी रामचंद्र सोनवणे आणि जगन रामचंद्र सोनवणे सर्व रा. नांद्रा ता.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.

Protected Content