गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १४ एप्रिल रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली, यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

कोरोनानंतर पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे डायरेक्टर शिवानंद बिरादार, प्रो.विशाखा वाघ, प्रो.पियुष वाघ, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

उपस्थितांच्या डोक्यावर निळ्या रंगाचा फेटा  बांधण्यात आला. तसेच डीजे च्या तालावर विद्यार्थिनींनि मनसोक्त नृत्य करत आनंद घेतला. महाविद्यालय परिसरातून यावेळी रॅली काढण्यात आली. रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर आनि गौतम बुद्ध यांची वेशभूषा साकारलेले सजीव देखावे रॅलीत होते, याप्रसंगी किवा तेवन येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजा करण्यात आली. यावेळी बाबाहेबांच्या जीवनावर आधारित  नृत्य नाटिकेचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच डीन डॉ आर्वीकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला, याचा फायदा उपस्थिताना झाला. यावेळी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील स्टाफ ची उपस्थिती होती. तसेच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

 शैक्षणिक संस्थांमध्ये महामानवाला अभिवादन 

गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ उल्हास पाटील फिजिओथेरपी, होमिओपॅथी, गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, गोदावरी  अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी अभियंत्रीकी व तंत्रज्ञान, गोदावरी व्यवस्थापन, डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालय, हॉटेल   मॅनेजमेंट अँड केटरिंग टेकनोलॉजि, संगीत महाविद्यालय, फॅशन टेकनोलॉजि यांच्यासह डॉ उल्हास पाटील cbsc स्कूल भुसावळ सह सावदा  आणि गोदावरी cbsc शाळेमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

Protected Content