फैजपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

फैजपूर –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

शाळा, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय व खासगी संस्थेत जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शहरातून मिरवणूक, मोटारसायकल रॅली यांसह मान्यवरांकडून उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य व ते आपल्या जीवनात कसे उपयुक्त आहे याचे महत्त्व विशद केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल यांच्यातर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, माजी उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, हेमराज चौधरी, सुनील शेठ वाढे, प्रा. उमाकांत पाटील,  सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक शेख मकसुद माजी नगराध्यक्ष निलेश राणे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, समाजसेवक इरफान शेख, रईस मोमीन, जलील शेख, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, माजी नगरसेवक डॉ. इम्रान शेख, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, दिव्यांग सेनेचे नानाभाई मोची, यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक हिवरे, उपाध्यक्ष सागर भालेराव, सचिव रॉक मेढे, खजिनदार रोहित मेढे, कार्यध्यक्ष शेख जहांगीर, सल्लागार मयूर मेढे, सदस्य उदय तायडे, बौद्ध पंच ट्रस्ट अध्यक्ष भीमराव मेढे, संतोष मेढे, विजय मेढे, भालचंद्र मेढे, अमर मेढे, पप्पू मेढे, सुमित साळुंके, अजय मेढे, भूषण मेढे, मुन्ना मेढे, योगीराज मेढे, राजू वाघ, चेतन मेढे, रितेश मेढे, अनिल मेढे, चंद्रगुप्त मेढे, नीरज मेढे, अमोल मेढे, बंटी मेढे, धीरज मेढे यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content