जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या जिल्ह्यात येत असून याच्या स्वागताची भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली.
महाजनादेश यात्रा ही ७ रोजी जिल्ह्यात येत असून मुख्यमंत्री एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. यानंतर ८ रोजीही यात्रा जिल्ह्यात असेल. या दरम्यान बोदवड, जामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर या मार्गाने महाजनादेश यात्रा काढण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.