अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुढची म्हणजे 2029 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी ते एका कार्यक्रमात बोलत होते. जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून परभाव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी त्यांचा मोठा मतांनी पराभव केला होता. या पराभवाचे कारण देखील जानकर यांनी सांगितले.
परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचेही जानकर यांनी सांगितले. परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे होते. तर वंचित बहुजन आघाडूकडून हवामान अभ्यायासक पंजाबराव डख हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा पराभव केला होता.