मुकेश अंबानीच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

 

मुंबई : वृत्तसंस्था । रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मोफत  होणार आहे.

 

विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल,” अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  ट्विटमध्ये दिली आहे.

 

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.

 

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं  कंपनीच्या नियमांमुळे त्यांनी आपलं नाव जाहीर केलेलं नाही.

 

 

उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली . हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली होती.

 

 

“ रस्ते मार्गाने ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का? असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन, जर हवाई वाहतूकीने आपण ऑक्सिजन आणू शकलो आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला केवळ परवानगी नाही तर हवाई दलाला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. आता एवढी निकड आपल्याला ऑक्सिजनची आहे. या मागणीसाठी मी पंतप्रधानांना फोन देखील करणार आहे व पत्र देखील लिहणार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

Protected Content