जळगाव, प्रतिनिधी | विद्यार्थ्याच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन प्रथितयश उद्योजक किशोर ढाके यांनी केले. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी मू. जे.महाविद्यालयचे खजिनदार डॉ. एस. आर. चिरमाडे यांचेसह प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक सीए वाय. ए. सैंदाणे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ.ए. पी. सरोदे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख
सीए आरसीवाला उपस्थित होते.
किशोर ढाके पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत कौशल्य सादरीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी “मेस्ट्रो” स्पर्धा महत्वाची ठरणार असून यातील सहभाग भविष्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना डॉ. ए.पी.सरोदे यांनी केली. स्पर्धेच्या युगात आपले उत्पादन विक्री करण्यासाठी नैतिकतेने सामोरे जावे. जीवघेणी स्पर्धा कधीही करू नका. विद्यार्थ्यांनी आयुष्यात करिअर करीत असताना आपले कौशल्य अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन उद्योजक स्वामी पोलिटेकचे सागर मंधान यांनी केले. या राष्ट्रीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण सागर मंधान यांचे हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक सीए वाय. ए. सैंदाणे,वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. ए. पी. सरोदे, व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रमुख सीए ए. एन. आरसीवाला उपस्थित होते. स्पर्धेचा आढावा डॉ. ए.पी.सरोदे यांनी घेतला. परीक्षकामधून प्रा. निशांत घुगे व प्रा. स्वनिल काटे यानी मनोगत व्यक्त केले. संघव्यवस्थापकांमधून धुळे विद्यावर्धिनी कॉलेजचे विजय पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धकांमध्ये कमल वाधवानी, याने मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन मुग्धा कुलकर्णी आणि केतकी सावंत यांनी केले. स्पर्धेसाठी डॉ. कल्पना नंदनवार, प्रा.सुरेखा पालवे, डॉ. संगीता पाटील, प्रा. गायत्री खडके, डॉ.विवेक यावलकर, प्रा.विशाल देशमुख, प्रा. नितीन चौधरी, प्रा.प्रतिभा तिवारी, प्रा. जास्मिन गाजरे, डॉ.प्रदीप जोशी, डॉ. प्रणव पाटील प्रा. पल्लवी राणे, प्रा. हर्शला देशमुख, प्रा. आश्विनी जाधव, प्रा. अश्विनी बारी, प्रा.किरण बारी, प्रा. धनश्री सुरळ्कर, प्रा. कोमल काजळे, प्रा.अंकिता महाजन, प्रा. वृषाली खाचने, प्रा. अमोल बावस्कर, प्रा. दिलवर वसावे, प्रा ज्योती पाटील, प्रा निलेश चौधरी, परिश्रम घेतले.