मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुतण्याला इडीकडून अटक

27 07 2019 ratul puri 19436952

 

भोपाल (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या आणि मोझरबेअर कंपनीचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ आहे. पुरी यांच्यावर ३०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयने सोमवारी त्यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले होते.

 

सेट्रल बँक ऑफ इंडियाकडून 354 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार रतुल पुरी, त्याचे वडिल दिपक पुरी, आई निता पुरी, संजय जैन, विनित शर्मा आणि कंपनी एमबीआयएलविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. सर्वांवर फसवणूक, कथितरित्या गुन्हेगारीचा कट आणि भ्रष्टाचारासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रतुल पुरीला 20 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. परंतु आज त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी 3 हजार 600 कोटी रूपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही रतुल पुरीचे नाव आले होते.

Protected Content