चाळीसगावात सोमवारपासून म.फुले जनआरोग्य योजनेची सुविधा उपलब्ध होणार (व्हिडीओ)

a2870181 6d0e 42ac 813e 556cbdb95476

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येत्या सोमवारपासून (दि.१५) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

त्यामध्ये क्रिटिकल केअर (सर्प दंश, विंचू दंश, विषप्राशन, विषबाधा, इ.), इमर्जन्सी सुविधा (अत्यावश्यक सेवा), जनरल डिसिज बालरोग व नवजात शिशु तसेच पल्मोनॉलॉजी ( फुफ्फुस व श्वसनासंबंधीचे सर्व आजार), स्पेशलिटी मधील आजारांच्या सर्व रुग्णांसाठी सदर योजने अंतर्गत मोफत उपचार केले जातील.
या योजनेअंतर्गत सेवा देण्यासाठीडॉ.राम बोरुडे (M.B.B.S.) डॉ.सुधन्वा कुलकर्णी, (M.B.B.S.F.C,PS, फिजिशियन) डॉ.योगेश पोतदार (M.B.B.S.D.C.H,बाल रोग तज्ञ) डॉ. शैलेंद्र महाले (M.B.R.S.D.N.B. फिजिशियन) डॉ. विनय पाटील (M.B. B.S.D.T.C.D, फुफ्फुस व छातीचे विकार तज्ञ) डॉ. हर्शल सोनवणे (M.B.B.S.,M.S.)व डॉ. कुणाल तलरेजा (M.B.B.S.,D.A.) हे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असतील. या सुविधेचा लाभ चाळीसगाव शहर व तालुक्यातील केशरी व पिवळे कार्डधारक अशा सगळ्या रुग्णांना घेता येणार आहे. तरी गरजंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ. संदीप देशमुख यांनी केले आहे.

 

Protected Content