पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ई- श्रमिक लेबर कार्ड शुभारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून ई- श्रमिक लेबर कार्ड शुभारंभ चाळीसगाव येथे करण्यात आले असून यावेळी एकूण ७१ जणांना कार्ड वितरित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ व्या  वाढदिवसाच्या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव शहरातील वैभव मंगलकार्यालय येथे ई- श्रमिक लेबर कार्ड शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वाढदिवस हे जाहिरात बाजीने साजरा न करता सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात येईल अशी माहिती गेल्या पत्रपरिषदेत खा. उन्मेष पाटील यांनी दिली होती. त्याच धर्तीवर ई- श्रमिक लेबर कार्ड शुभारंभ चाळीसगाव येथून खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी वाढदिवस हे ७१ वा असल्याने ७१ जणांनाच कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी खा. उन्मेष पाटील म्हणाले, ई- श्रमिक लेबर कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कार्डधारकांना दोन लाखांचा विमा कवच मिळणार आहे. दरम्यान तालुक्यात ७१ हजार जणांचे नाव नोंदणी करण्याचे संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रमाप्रसंगी खा. उन्मेष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळूंके, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, डॉ. रविंद्र मराठे, दिपक परदेशी, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे जितेंद्र देशमुख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यु. डी. माळी, आर.सी.पाटील, वाणी समाज मंडळ संचालक बाळासाहेब शिंकर, आयोजक किराणा भुसार असोसिएशन व सामाजिक कार्यकर्ता अजय वाणी, जेष्ठ मार्गदर्शक माधवराव पाटील, सोमनाथ ब्राह्मणकार, लक्ष्मण दुसे, संतोष थोरात, योगेश माने, गणेश चौधरी, राहूल जोडगे, विलास शिंदे, कैलास मांडुळे व भगवान ठाकरे आदी उपस्थित होते.

Protected Content