एम. एम. महाविद्यालयात “भारतीय स्वातंत्र्य चळवळ एक सिंहावलोकन” विषयावर चर्चासत्र

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीशेठ मुरलीधर मानसिंगका कॉलेज, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ एक सिंहावलोकन’ या विषयावर 14 सप्टेंबर रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे संपन्न झाले. दरम्यान, या कार्यक्रमाचे उद्घाटन ध्येय ॲकेडमीचे संचालक संदीप दा. महाजन यांनी केले. यावेळी व्यासपिठावर नुतन प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, माजी प्राचार्य डॉ. वासुदेव वले, शेंदुर्णी महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख, उप प्राचार्य जे. व्ही. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जे. व्ही. पाटील यांनी केले. सोबतच त्यांनी दि. १४ सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने “स्वतंत्रता आंदोलन और हिंदी भाषा की भूमिका” या विषयावर विचार मांडले. संदीप दा महाजन यांनी “पाचोरा तालुक्याचा स्वातंत्र्याचा इतिहास” विद्यार्थ्यांसमोर ओजस्वी शैलीत मांडत असतांना उपस्थीतीच्या अंगावर शहारे आले होते. चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी “भारतीय स्वातंत्र्यात महाराष्ट्राचे योगदान” या विषयावर आपले विचार मांडले. चर्चासत्रात विशेष वक्ते म्हणून शेंदुर्णी महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख यांनी “भारताच्या फाळणीचा इतिहास” विशद केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, भारताच्या फाळणीचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्याच्या संग्राम या संदर्भात विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथांचे अवलोकन करावे. चर्चासत्राचे अध्यक्ष संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी यांनी विद्यापीठ व महाविद्यालय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्त आयोजन कार्यक्रम सर्व स्तरावरील व्यक्तींसाठी किती उपयोगी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल भोसले यांनी केले. डॉ. माणिक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. जे. डी. गोपाळ होते. सदरच्या चर्चासत्रासाठी पारोळा, शेंदुर्णी, भडगाव येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम प्रसंगी डॉ. वासुदेव वले, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. नितीन पाटील, प्रा. अधिकराव पाटील, डॉ. जितेंद्र सोनवणे, प्रा. स्वप्निल पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. वैष्णवी सं. महाजन, प्रा. इंदिरा लोखंडे, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी बी. जे. पवार, जयेश कुमावत, समाधान पवार, जावेद देशमुख, सुरेंद्र तांबे, प्रकाश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content