जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत एम.एम. महाविद्यालयाचे यश

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस नन्यूज प्रतिनिधी । विद्यार्थी सेवा समिती आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले.

द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उत्तेजनार्थ (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी आशिराना फिरोज फकीर हिने उत्तेजनार्थ (द्वितीय) क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा भडगाव येथील नालंदा बुद्धविहार येथे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या दोन्ही विद्यार्थिनींना महाविद्यालयातील प्रा. जयश्री वर्मा, वाघ मॅडम आणि प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांचे बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Protected Content