पाळधी जवळ लक्झरी बस उलटली !

पाळधी, ता. धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्‍या महामार्गावरून जाणारी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जळगावहून अहमदाबाद येथे जाणारी लक्झरी बस ही पाळधी जवळच्या हॉटेल सुगोकीच्या जवळ अचानक पलटी झाली. क्षणार्धात झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांनी किंकाळ्या फोडल्या. यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत. या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्याबरोबर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अपघातस्थळ गाठून जखमींची विचारपूस करत त्यांना उपचारासाठी मदत केली. दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा प्रतिनिधी घटनास्थळी पोहचला असून आम्ही लवकरच या संदर्भात आपल्याला विस्तृत वृत्त देणार आहोत.

Protected Content