जळगाव प्रतिनिधी । रिक्षाचालक व प्रवासी असल्याचे भासवून एकट्या प्रवाशाला रिक्षात बसवून कोडवर्डमध्ये बोलून त्याच्या खिशातील पैसे, पाकीट, मोबाइल लांबवणाऱ्या फरार असलेल्या दोघांना जिल्हा पेठ पोलीसांनी शनिवारी रात्री उशीरा अटक केली आहे. यापुर्वी एकाला याच गुन्ह्यात अटक केली होती. या टोळीने आणखी अनेक गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, एकट्या प्रवाशाला रिक्षात बसवून सांकेतिक भाषामध्ये बोलून त्याच्या खिशातील पैसे, पाकीट, मोबाइल लांबवणाऱ्या टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी यापुर्वी केला होता. यातील प्रद्युम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय १९, रा. व्यसनमुक्ती केंद्राजवळ, पिंप्राळा) असे अटक केलेल्या भामट्याचे अटकही केली होती. वामन पाटील यांच्या खिशातील १० हजार रुपये लांबवल्याची कबुली बंटीने दिली आहे. बंटीने तिघा साथीदारांची नावे देखील पोलिसांना सांगितली आहे. त्यानुसार त्यांचा शोध गेल्या 15 दिवसांपासून सुरू होता. दरम्यान, 20 दिवसांपूर्वी पिंप्राळा येथील छाया बैरागी या महिलेच्या घरात घुसून ७५ हजार रुपये रोख व दोन मोबाईल लांबवल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात देखील बंटी संशयित आहे.
शनिवारी सायंकाळी संशयित आरोपी राहुल सुरेश आरखे रा. चौघुल प्लॉट आणि सुरज नितीन मोरे रा. अशोक नगर, शिरसोली हे जळगाव बसस्थानकात येत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांना मिळाली होती. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तुषार जावरे, शेखर जोशी, फिरोज तडवी, प्रशांत जाधव, छगन तायडे, हेमंत तायडे, अविनाश देवरे, जितेंद्र सुरवाडे, जगन सोनवणे यांनी सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. दोघा आरोपींची कसुन चौकशी करण्यात येत आहे. यापुर्वी झालेले लुटमार आणि चोरीतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.