‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना : ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्यांना बक्षिसे

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’मुळे खामगाव शहरात वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाइन व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण कंपनीने ही योजना १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीसाठी सुरू केली असून, यामध्ये नोंदणीकृत डिजिटल ग्राहकांना भाग्यवान विजेता होण्याची संधी मिळत आहे.

या योजनेअंतर्गत अशा ग्राहकांचा विचार केला जातो, ज्यांनी मागील वर्षभर (०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४) ऑनलाइन वीजबिल भरलेले नसेल, पण सध्या सलग तीन महिने ऑनलाईन व्यवहार केले आहेत. ग्राहकाची थकबाकी १० रुपयांपेक्षा अधिक असावी, आणि प्रत्येक व्यवहार किमान ₹१०० चा असावा. सार्वजनिक पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट ग्राहक अपात्र आहेत.

लकी ड्रॉचे विजेते:

प्रथम पारितोषिक – Samsung मोबाईल फोन
– विश्वास विश्वनाथ वराडे, दाल फैल, खामगाव

संयुक्त द्वितीय पारितोषिक – Redmi मोबाईल फोन
– गोकुलचंद गोविंदलाल सानंदा, खामगाव
– प्रकाश पुंडलिक घोगले, वाडी

संयुक्त तृतीय पारितोषिक – स्मार्ट वॉच
– सूर्यभान देवराव पाटील, सुटाळा
– जिगेश केशवलाल पटेल, तलाव रोड

दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी खामगाव उपविभागामध्ये आयोजित कार्यक्रमात सहायक अभियंते अंजंकर, परळकर, डोंगे, कनिष्ठ अभियंता कु. पाटील, तसेच विभागातील भातकुळकर, गावंडे, गाडे आणि अन्य कर्मचारी यांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.

महावितरणकडून सर्व ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे पारदर्शकता वाढते आणि डिजिटल व्यवहारांना चालना मिळते.

Protected Content