डोंगर कठोरा कक्ष अभियंता व कर्मचाऱ्यांचा सत्कार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा विभागातील व फैजपूर उप विभागातील डोंगर कठोरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कक्ष अभियंता ऋतुजा पाटील व वीज कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कक्ष अभियंता ऋतुजा पाटील व त्यांच्या संपूर्ण सहकर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.तालुक्यातील फैजपूर येथील शुभ दिव्य लान्सवर आयोजित कार्यक्रम प्रसंगी सदर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सावदा विभागातील व फैजपूर उपविभागातील डोंगर कठोरा येथील कक्ष अभियंता ऋतुजा पाटील व वीज कर्मचारी स्टाफ यांनी फैजपूर उपविभागात वसुली कामी ९७.६ टक्के वसुली करून उत्कृष्ट कामगिरी केली.सदरहू त्यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल कक्ष अभियंता ऋतुजा पाटील व संपूर्ण स्टाफ कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमात सावदा विभागातील यावल, रावेर, फैजपूर व सावदा डिव्हिजन मधील ४० कक्ष अधिकारी,उपविभागीय अभियंता व जनमित्र यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी,अधिक्षक अभियंता अनिल महाजन,सावदा कार्यकारी अभियंता गणेश महाजन,उपव्यवस्थापक प्रकाश कोळी,अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील,डोंगर कठोरा कक्ष अभियंता ऋतुजा पाटील,लाईनमन प्रकाश तायडे,वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र डोळसे,माधव टोके,महेंद्र कुरकुरे,अमित बेंडाळे,गणेश पाटील,स्वप्नील भालेराव,उमेश पाटील,रवींद्र भोई यांच्यासह सावदा विभागातील वीज अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content