पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आज आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व तालुका विधी सेवा समिती, पाचोरा तथा वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आज ११ फेब्रुवारी रोजी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एम. जी. हिवराळे मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयास सुरुवात झाली आहे.
या लोक न्यायालयात स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, पोलिस प्रशासनाचे ट्रॉफिक विभाग, जळगांव जनता बँक, बी. एस. एन. एल. यासह दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखल पुर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी सदरच्या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक न्यायालयातील फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम १३८ खालील दाखल प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, अपघात व्यायाधिकरणा बाबतची प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयका बाबतीची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळुन), वैवाहिक वादा बाबतची प्रकरणे, अशा स्वरूपाची प्रलंबित प्रकरणाचा सामंजस्याने मिटविण्यात येत आहेत.