जळगाव प्रतिनिधी । व्यवसाय वाढीसाठी रकमेची आवश्यकता असल्याने एका क्रॉकरी व्यवसायिकाला कर्ज मिळावे यासाठी एका फायनान्स गृप कंपनीने वेळोवळी पैसे मागणी करत 1 लाख 8 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, हार्दीक राजेंद्र पिपरीया रा. संगम सोसायटी, रिंगरोड यांचे क्रॉकरीचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना दीड लाख रूपयांचे लोन हवे होते. त्यांनी एका वर्तमानपत्रात एका फायनान्स जन कल्याण योजना द्वारा लोन मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला असता शुभम मुरारी पांडे हे बोलत असल्याचे सांगितले. स्वताचा परीचय करून देतांना सांगितले की, मी फायनान्स ग्रुप लि.मध्ये नोकरीस असून कर्ज प्रकरणाची कामे करतो. त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरूवातीला एक हजार रूपये प्रोसेसिंग फि भरा असे सांगितल्यानंतर 4 जून रोजी त्यांनी अर्ज केला. 7 जून रोजी 1 हजार रूपये कॅनरा बँकेतून श्री उपासना मौर्य या नावावर पैसे भरले. त्यानंतर आरोपीला वेगवेगळ्या कारणे सांगून
10 जून रोजी 4 हजार 50,
11 जून रोजी 9 हजार 500,
14 जून रोजी 12 हजार,
17 जून रोजी 23 हजार,
17 जून रोजी 18 हजार,
21 जून रोजी 13 हजार 500,
22 जून रोजी 10 हजार,
27 जून रोजी 18 हजार 500
असे एकुण 1 लाख 8 हजार 550 रूपयांना गंडा घातला. एवढी रक्कम भरल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे समजताच त्यांनी कर्ज नको असल्याने तसा अर्ज देखील केला. तरी देखील त्यांनी भरलेली पुर्ण रक्कम त्यांना मिळाली नाही.