‘एल.एम.सी. कॅट’ने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला: माजी आ.शिरीषदादा चौधरी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ॲप्टिट्यूड टेस्ट’ (एल.एम.सी. कॅट) २०२४ आणि २०२५ चा पारितोषिक वितरण सोहळा १० मार्च २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतात या परीक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.

श्री. चौधरी म्हणाले, “रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याने स्पर्धा परीक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील मौखिक परीक्षांसाठी उपयुक्त ठरते. या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या रवींद्र जाधव, मानसी फिरके, यामिनी भालेराव यांनी या परीक्षेचे महत्त्व सिद्ध केले आहे.”

या कार्यक्रमाला तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, संस्थेचे चेअरमन लीलाधर चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. के. आर. चौधरी, सहसचिव नंदकुमार भंगाळे, कार्यकारी सदस्य डॉ. एस. एस. पाटील, संजय चौधरी, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे आणि सर्व उपप्राचार्य उपस्थित होते. विविध महाविद्यालयांच्या स्थानिक समन्वयकांनी (प्रा. अतुल पाटील, पाचोरा; डॉ. जयंत नेहेते, ऐनपुर) आपल्या मनोगतात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘एल.एम.सी.सी.ए.टी.-२०२४’ मधील यशस्वी विद्यार्थी:

कु. चक्रधर रवींद्र जाधव (एस.एस.एम.एम. कॉलेज, पाचोरा) – देशात प्रथम क्रमांक
कु. मानसी मीना फिरके (पी.ओ. नाहाटा कॉलेज, भुसावळ) – देशात द्वितीय क्रमांक
कु. साक्षी प्रकाश रिठे (श्रीमती इंदिराजी कापडिया कॉलेज, बडनेरा, जिल्हा अमरावती) – देशात तृतीय क्रमांक
‘एल.एम.सी.सी.ए.टी.-२०२५’ मधील यशस्वी विद्यार्थी:

कु. यामिनी भालेराव (आर्ट व सायन्स भालोद) – देशात प्रथम क्रमांक
कु. सुश्मिता-श्री. (लाल बहादूर शास्त्री डिग्री कॉलेज, गोंडा, उत्तर प्रदेश) – देशात द्वितीय क्रमांक
कु. अनिश संतोष बोरसे (प्रताप कॉलेज, अमळनेर) – देशात तृतीय क्रमांक
कार्यक्रमाची सुरुवात विभाग प्रमुख डॉ. डी. बी. तायडे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. प्रा. नाहीदा कुरेशी आणि डॉ. पल्लवी भंगाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. योगेश तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राकेश तळेले, डॉ. शेरसिंग पाडवी, डॉ. हरीश तळले, डॉ. मछिंद्र पाटील, प्रा. अचल भोगे, विकास वाघुळदे, निलेश पाटील, हंशाली पाटील, चैताली पाटील, सुजित भाट, पूजा महाजन, ज्ञानदेव चव्हाण, जितेंद्र चौधरी, अरुण सैंदाणे, गोपाळ देवकर आणि स्वप्नील हिवरे यांनी विशेष योगदान दिले.

Protected Content