साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनींनी पशुधन लसीकरण मोहिमेत लाळ्या आणि खुरकूत या रोगाच्या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला व जनावरांचे आरोग्य जपण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदिप श्रीखामदे यांनी जनावरांचे लसीकरण केले. तसेच कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संदिप पाटील यांनी याबद्दल विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे चेअरमन डॉ.अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाबासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. तुषार भोसले आदी शिक्षकांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. या लसीकरणासाठी भगवान पाटील, केतन पाटील, धीरज पाटील आदी शेतकऱ्यांनी सहभाग दाखविला.गावाचे सरपंच श्री सागर सोनवाल यांनी या लसीकरणाकरिता विद्यार्थिनींनी प्रोत्साहित केले.