डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम शाळेत स्नेहसंमेलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेचे स्नेहसंमेलन २०२४  ‘डियुपीईएमएस ऑडसी’ चे उद्घाटन १२ जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या डिआरएम इती पांडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, प्रिन्सीपल अनघा पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलचे डीन डॉ. प्रशांत सोलंकी, सुप्रीन्टेडंन्ट डॉ. प्रेमचंद पंडीत यावेळी उपस्थित होते,

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य, नाट्य, सादर करून आपल्यातील कलागुण सांस्कृतीक कार्यक्रमातुन सादर केले व सर्व उपस्थीतांचे मने जिंकली.पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेतील शेकडो विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. शाळेच्या इमारतीवर विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी डीआरएम इती पांडे व डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

डॉ उल्हास पाटील म्हणाले की भुसावळातील सीबीएससीचे ज्युनिअर कॉलेज असलेली ही पहिली एकमेव शाळा आहे. गेल्या 23 वर्षापासून ही संस्था सुरू आहे आणि या संस्थेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे पुढे आयआयटी, इंजिनियर व इतर मोठे अधिकारी झाले. डीआरएम इती पांडे म्हणाले की विदयार्थींनी अभ्यास करून खेळले ही पाहीजे, खेळल्याने आपल्या शरीरातील ऑक्सीजन वाढतो, खेळ तुम्हाला जिंकणे व हारणे शिकवतो, तुमची संस्था ही नावाजलेली संस्था आहे येथून खूप चांगले विदयार्थी घडून गेले असतील. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये असलेली ही शाळा पुढे अजून चांगले विद्यार्थी घडवेल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पुनम कुंडु व स्मिता भोलाणे यांनी केले.

Protected Content