कठोर परिश्रम घेतल्यास आईस हॉकी सारख्या खेळामध्येही उज्ज्वल भविष्य – विशाल जवाहरानी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जगात सर्वत्र तापमान सारखे नसते हि खरी गोष्ट आहे. मात्र भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकी सारख्या खेळात प्रावीण्य मिळविल्यास या खेळात उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन भारतीय टीमचा आईस हॉकीचा उपकर्णधार विशाल जवाहिरानी याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. विशाल यांनी दिलखुलासपणे पत्रकारांशी वार्तालाप करताना आईस हॉकी या खेळाविषयी विविध पैलू समोर मांडले. २००२ मध्ये विशाल हा ३ वर्षांचा असताना त्याची आजी प्रेमा जवाहरानी यांनी प्रथम स्केटिंगचे धडे दिले तिने स्वतःहून स्केटिंगची लेस बांधून विशाल याला तयार केले. यानंतर प्रशिक्षक विशाल मोरे, संजय पाटील यांनी स्केटिंग शिकविल्यानंतर हळूहळू या ED खेळात पारंगत होत गेल्याचे विशाल ने सांगितले. २००९ मध्ये वयाच्या ९व्या वर्षी पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २००२ ते २०१५ या कालावधीमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.

२०१५ मध्ये पहिल्यांदाच अमेरिकेत जाऊन आईस हॉकी बघितल्यानंतर या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाल्याने या आईस हॉकी खेळाचे बारकावे शिकल्यानंतर २०१७ मध्ये टीम इंडिया ज्युनियर पुरुषांचा उपकर्णधार बनून मलेशियामध्ये आईस हॉकीचे सामने खेळताना प्रतिनिधित्व केले. २०१८ साली इटली आणि दक्षिण कोरियामध्ये टीम इंडिया इनलाइन हॉकीसाठी खेळला. २०१८ मध्ये भारतीय संघाला पहिले कांस्य पदक दक्षिण कोरियात प्राप्त करून देण्यात विशाल याचा सिंहाचा वाटा आहे. २०१८ मध्ये टीम इंडियासाठी स्पेनमध्ये वर्ल्ड रोलरचे सामने खेळले.

२०१६ ते ते २०२३ पर्यंत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त केली असून या खेळात प्राविण्य मिळविल्यानंतर २०२३ मध्ये, कॅनडाच्या नंबर १च्या आइस हॉकी स्कूल सेंट अँड्र्यू कॉलेजमध्ये प्रशिक्षण देणारा भारताचा पहिला आइस हॉकी खेळाडू. ठरला आहे. विशाल आता भारताचा आइस हॉकी अँबेसेडर आणि पायनियर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आईस हॉकी हा खेळ वैशिष्ट्यपूर्ण असून या खेळामध्ये उज्ज्वल भविष्य असून या खेळाकडे वळल्यास अनेक संधी देखील मिळू शकतात असेही त्याने सांगितले. स्केटिंग शिकत असताना पडत झडत सुरुवात केल्याचे मला आठवते. मात्र जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मोठ्या मेहनतीने पोहचलो. याचा मला अभिमान आहे. आज भारत देशासाठी खेळत असल्याचा मला गर्व वाटत आहे. असेही विशालने सांगितले.

विशाल जवाहरानी याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी आजी श्रीमती प्रेमा शीतलदास जवाहरानी, आजोबा आणि जनता शॉपीचे संचालक शीतलदास जवाहरानी, वडिल स्व. विनोद जवाहरानी, आई उषा जवाहरानी, काका राजेश जवाहरानी व काकी सोनल जवाहरानी यांच्यासह कुटुंबाने दिलेल्या भक्कम पाठबळावर आज आईस हॉकीचा उप कर्णधार बनलो असून टीम इंडियाचा ब्रँड अँबेसेडर बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु असल्याचे विशाल सांगतो. आपल्या देशाच्या उप कर्णधार पदी निवड होणे विशालसाठी खूप आनंददायी होते. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे जवाहरांनी कुटुंबीयांसह जळगाव जिल्हा वासीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. कठोर परिश्रम घ्या आणि पुढे चालत राहा असा संदेश विशाल जवाहरानी यांनी खेळाडूंना दिला आहे.

यांचे मिळाले सहकार्य व मार्गदर्शन

भारत इनलाइन हॉकी साठी अमित शर्मा सर, कोच विली (इटली), कोच निकोला (इटली), ग्रेट वैली हाई स्कूल कोचिंग स्टाफ भारत आइस हॉकी कोच आशु सिंह, अमित बेलवाल सर, मुष्टक गिरी, मार्गदर्शक हरजिंदर सिंह जिंदी सर एवं जगराज सिंह साहने सर, आइस हॉकी विकास कोच डेनिस (रूस), कोच हिमानी त्यागी (पुणे), डॉ. आदित्य खाचणे, सेंट. एंड्रयू के कॉलेज कोचिंग स्टाफ यात कोच डेविड मैनिंग, केविन गेट, कोच जेफ ब्रेना, कोच एंड्रयू, डॉ. नताली, आंतरराष्ट्रीय समर्थन रोब लालोन्डे (बटेन्ज के मालिक), एंथोनी (ब्लेडटेक के मालिक), मार्टिन हंटर, फ्रेड पेरोन (हॉकी विदाउट बॉर्डर्स)